EPFO Bharti 2024 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये वकील पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

EPFO Bharti 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्यामार्फत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून वकील पदासाठी नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ” पॅनल सल्लागार ( वकील )” या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड या भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन ई-मेल द्वारे आणि ऑफलाईन पत्राद्वारे दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • ” पॅनल सल्लागार ( वकील ) ” हे पद भरण्याकरिता संस्थे कडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकरीची सुवर्णसंधी.

EPFO Bharti 2024 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती करिता शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालील प्रमाणे.

  • EPFO Bharti 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार राज्याच्या बार कौन्सिलला जिल्हा रजिस्टर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे वकिलीचा सात वर्षाचा अनुभव असावा.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ईमेल आयडी द्वारे अर्ज करावा.
  • acc.thane@epfindia.gov.in या ईमेल आयडी वर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
  • ” अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, मुंबई-II, ठाणे झोन यांचे कार्यालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, वरदान कमर्शियल कॉम्प्लेक्स, 6 वा मजला, MIDC, रस्ता क्रमांक 16, वागळे इस्टेट, ठाणे.  मुंबई – 400604.” या पत्त्यावर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • 15 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. कारण ही शेवटची तारीख आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्याकडून देण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • मुंबई हायकोर्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रिब्यूनल ( CGIT ) I & II, मुंबई, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ट्रिब्यूनल ( CAT ), मुंबई, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल ( NCLT ), मुंबई , स्टेट कंज्यूमर डिसप्युट रेड्रेसल कमिशन, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट कंजूमर फोरम ( मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर ) , डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि लोवर कोर्ट ( मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर ) या ठिकाणचे न्यायालयीन कामकाज पाहण्याकरिता वकिलांची आवश्यकता आहे.
  • बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे रजिस्ट्रेशन असलेले वकील सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण, अनुभव, फि, अर्जाचा नमुना आणि इतर नियम व अटी जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.
  • जे वकील आधीपासूनच EPFO च्या पॅनल वरती आहेत. अशा वकिलांना सुद्धा सदरील भरती करिता अर्ज करता येणार आहे.
  • Annexure ‘A’ आणि Annexure ‘B’ मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्या नुसार पात्र वकील सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
  • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे लिफाफा मध्ये बंद करून पाठवायचे आहेत.
  • ” Regional Provident Fund Commissioner- I ( Legal ), O/o Additional Central Provident Fund Commissioner, Mumbai – II, Thane zone, Employees Provident Fund Organisation, Vardan Commercial Complex 6th Floor, MIDC, Road No.16, Wagale Estate, Thane Mumbai – 400604″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, फि, अर्ज, नियम व अटी यासंदर्भातील संपूर्ण माहिती EPFO च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रा सोबत 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 04 वाजेपर्यंत ई-मेल आयडी द्वारे किंवा पत्राद्वारे जमा करायचा आहे.
  • EPFO च्या कोर्टात चालणाऱ्या केसेस व्यवस्थित चालविण्याकरिता वकिलांची आवश्यकता आहे. त्याकरिता योग्य वकिलांची निवड करण्यात येणार आहे.
  • संस्थेवर कोणतीही कायदेशीर कारवाई होण्याअगोदर सदरील केस कोर्टामध्ये चालविण्याकरिता EPFO कडे वकील आहेत. केसेस चालवणाऱ्या वकिलांची फी EPFO द्वारे ठरवली जाते.
  • कोर्टामध्ये चालणाऱ्या कायदेशीर केसेस वकिलांना EPFO च्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालवाव्या लागणार आहेत.
  • ज्या न्यायालयामध्ये काम चालणार आहे आशा न्यायालयाच्या आवारात अर्ज करणाऱ्या वकिलांचे ऑफिस असणे गरजेचे आहे. ऑफिस मध्ये चेंबर, लायब्ररी, मॅन पॉवर इत्यादी गोष्टी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा वकील उमेदवार संभाषण कौशल्य मध्ये पारंगत असावा.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरतीसाठी मिळालेल्या अर्ज मधून योग्य उमेदवाराची निवड EPFO द्वारे करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या वकिलांना पदावर नियुक्त करण्यापूर्वी बातचीत करण्याकरिता बोलावण्यात येईल. त्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरती मधील उमेदवाराचा अर्ज रिजेक्ट करायचा किंवा एक्सेप्ट करायचा पूर्णपणे अधिकार EPFO यांच्याकडे राहील. सदरील भरती पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार EPFO यांच्याकडे असणार आहे.
  • सदरील भरती मधून वकिलांची नियुक्ती ही 03 वर्षांकरिता होणार आहे.
  • सदरील भरती मधून वकिलांची नियुक्ती ही 03 वर्षांकरिता होणार आहे. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन महिन्याच्या अगोदर नवीन उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. जोपर्यंत नवीन उमेदवारांची निवड केली जात नाही तोपर्यंत जुने उमेदवार काम करू शकतात.
  • वकिलांना देण्यात येणारी फी EPFO द्वारे ठरवण्यात येईल. हि फी वेळेनुसार बदलण्यात येईल. काही केसेसमध्ये EPFO द्वारे वकिलांना जाहिरातीत दिलेल्या फी पेक्षा किंवा ठरलेल्या फी पेक्षा अधिक फी देण्यात येईल. त्यावेळेस उमेदवाराचे अधिक कष्ट आणि मेहनत लक्षात घेऊन वाढीव फी देण्यात येईल.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरतीसाठी आवश्यक पात्रतेची पूर्तता केली म्हणून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सदरील भरती मधील पदांवर आपला हक्क सांगता येणार नाही.
  • योग्य वकिलाची निवड करण्याचा अधिकार पूर्णपणे EPFO कडे असणार आहे.
  • सदरील भरती मधील पदांवर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही कोणत्याही प्रकारचा वशिला लावणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरतीची तारीख, वेळ या सर्व गोष्टी उमेदवाराला अर्ज भरताना देण्यात आलेल्या ईमेल आयडी द्वारे कळवण्यात येथील. किंवा SMS द्वारे कळविण्यात येतील.
  • उमेदवारांनी सर्व ओरिजनल कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

EPFO Bharti 2024 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

  1. विधी पदवी आणि इतर पदवीच्या प्रती
  2. बार कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ची प्रत
  3. बार असोसिएशनच्या ओळख पत्राची प्रत.
  4. ओळख पत्राची प्रत
  5. 10 जजमेंट च्या प्रती ज्यामध्ये उमेदवाराने वकील म्हणून काम पाहिले आहे.
  6. न्यायालयाकडून वकीला बाबत देण्यात आलेले प्रमाणपत्र.
  7. अर्जदाराचा रिझ्युम त्यामध्ये अनुभव, बॅकग्राऊंड, शिक्षण, पक्षकारांची नावे आणि केस चे प्रकार
  8. सध्याचे दोन कलर पासपोर्ट साईज फोटो.
  9. मागील दोन वर्षात भरलेला इन्कम टॅक्स रिटर्न ची कॉपी.

EPFO Bharti 2024 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येथील भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवार फक्त ई-मेल द्वारे करू शकतो. इतर कोणत्याही वेबसाईट द्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
  • या भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण, नाव, पिनकोड, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे वैध सादर करायचे आहेत. जर यामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. व यासाठी सर्वस्व उमेदवार जबाबदार असेल.
  • EPFO Bharti 2024 सदरील भरती करिता 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

EPFO Bharti 2024 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच निवडले जातील.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था येथील भरतीसाठी बातचीत करण्याकरिता येणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • EPFO Bharti 2024 या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • उमेदवाराला पदावर नियुक्त करण्याचा आणि पदावरून कमी करण्याचा पूर्णपणे अधिकार EPFO यांच्याकडे राहील.
  • सदरील भरती संदर्भातील नियम व अटी EPFO च्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी नियम व अटी वाचून अर्ज करायचा आहे.

EPFO Bharti 2024 | पदावर नियुक्त झालेले वकील खालील कारणांमुळे पदावरून कमी होऊ शकतात.

  • उमेदवारांनी अर्जात चुकीची माहिती भरलेली असल्यावर उमेदवाराला कामावरून कमी करण्यात येऊ शकते.
  • कोणतेही पूर्व कारण न देता कोर्टात कामाच्या दिवशी उपस्थित न राहिल्यामुळे उमेदवाराला कामावरून कमी करता येऊ शकते.
  • EPFO यांच्या सांगण्याप्रमाणे वर्तणूक न केल्यास किंवा संस्थेचे नियम मोडल्यास उमेदवाराला कामावरून कमी करता येऊ शकते.
  • EPFO च्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला धमकी दिल्या वर उमेदवाराला पदावरून कमी केले जाईल.
  • EPFO यांच्या केस संदर्भात कोणतीही माहिती विरोधकाच्या वकीलाला देणे. किंवा इतर कोणालाही समजवणे. अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य उमेदवाराकडून घडल्यास त्याला कामावरून कमी करण्यात येईल.
  • केस संदर्भात खोटी माहिती EPFO ला कळवल्यावर उमेदवाराला कामावरून कमी करण्यात येईल.
  • पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराला काम व्यवस्थित करता येत नसेल किंवा त्याच्या कामाचा दर्जा योग्य नसेल तर त्याला कामावरून कमी करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी EPFO Bharti 2024 वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment