MPSC Civil Services Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या भरती बद्दल विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 782 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून कर्ज मागवण्यात आलेले आहेत. 7 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. पण आता शेवटची तारीख वाढवून 17 ऑक्टोबर 2024 करण्यात आलेली आहे. एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या भरती मधून उपजिल्हाधिकारी ( गट – अ ), सहाय्यक कर आयुक्त ( गट-अ ), गटविकास अधिकारी ( गट-अ ), सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा, सहाय्यक आयुक्त / प्रकल्पाधिकारी, उद्योग उपसंचालक, सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक आयुक्त, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त ( राज्य उत्पादन शुल्क ), उप अधिक्षक( राज्य उत्पादन शुल्क ), मार्गदर्शन अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्पाधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / गृह प्रमुख / प्रबंधक, उद्योग अधिकारी, सहाय्यक प्रकल्पाधिकारी ( शिक्षण ), निरीक्षक अधिकारी ( पुरवठा ), सहाय्यक वनरक्षक, वनक्षेत्र पाल, विभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी किंवा सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती एकूण 782 जागा करिता होणार आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरती मधून सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, कृषी सेवा विभाग या विभागात विविध पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
[ MPSC Civil Services Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त असलेली पदे खालील प्रमाणे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या खालील विविध विभागामध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
- सामान्य प्रशासन विभाग या विभागातील एकूण 431 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महसूल व वन विभाग या विभागात एकूण 48 जागा रिक्त आहेत.
- मृद व जलसंधारण विभाग या विभागातील एकूण 45 जागा रिक्त आहेत.
- कृषी सेवा विभाग या विभागातील एकूण 258 जागा रिक्त आहेत.
- राज्यसेवा परीक्षा या संवर्गातील उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. किंवा 55% गुणाने बीकॉम + एमबीए पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजीनियरिंग ची पदवी मिळवलेली पाहिजे.
- MPSC Civil Services Bharti 2024 महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र / भूशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी या शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली पाहिजे.
- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कृषी पदवी /कृषी अभियांत्रिकी पदवी /उद्यानविद्या पदवी यापैकी कोणतीही एक पदवी मिळवलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी MPSC Civil Services Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 19 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील आणि अनाथ उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 544 रुपये असणार आहे. तर मागास आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 344 रुपये असणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारा करिता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य असणार आहे.
- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
[ MPSC Civil Service Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज करण्याची ऑफलाइन प्रणाली राबवण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन अर्ज भरत असताना उमेदवारांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण या सर्व गोष्टी अर्जामध्ये व्यवस्थित भरायचे आहेत. अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक झाली तर अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद करता येऊ शकतो.
- अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज 17 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर भरावा.
- MPSC Civil Services Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
[ MPSC Civil Services Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. असे उमेदवार पात्र असू शकतात.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व उमेदवारांनी नियमांचे पालन करायचे आहे. परीक्षा केंद्रावर शांतता राखायची आहे. परीक्षेसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- MPSC Civil Services Bharti 2024 सदरील परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी हॉल तिकीट सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. हॉल तिकीट बरोबर नसेल तर उमेदवाराला परीक्षा केंद्रावर एन्ट्री केली जाणार नाही.
- परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी मोबाईल, स्मार्टवॉच, गणक यंत्र त्याचप्रमाणे इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ला सोबत घेऊन यायचे नाही.
[ MPSC Civil Services Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी खेळाडूंचे आरक्षण खालील प्रमाणे.
- शासन नियमानुसार खेळामध्ये प्राविण्य प्राप्त असलेल्या खेळाडूंना एकूण पदांमध्ये ठराविक आरक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे वयामध्ये सुद्धा सूट देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा साठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी खेळामध्ये प्राविण्य प्राप्त असलेले प्रमाणपत्र उमेदवाराला मिळालेले पाहिजे. हे प्रमाणपत्र क्रीडा अधिकारी याने प्रमाणित केलेले असणे गरजेचे आहे.
- पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वीच उमेदवारांनी आपले खेळाचे प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळून घेणे बंधनकारक आहे. तरच उमेदवार आरक्षणासाठी पात्र ठरू शकतो.
- पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वीच उमेदवारांनी आपले खेळाचे प्रमाणपत्र पडताळून घेतलेली नसेल. किंवा प्रमाणपत्र पडताळणीनंतर पोचपावती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. पडताळणी दरम्यान खेळाचे प्रमाणपत्र पात्र ठरले नाही तर उमेदवाराला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
- MPSC Civil Services Bharti 2024 उमेदवाराची निवड झाल्यानंतर पदावर नियुक्ती दरम्यान कागदपत्राची पडताळणी केली जाते. या पडताळणीत उमेदवाराचे क्रीडा प्रमाणपत्र सुद्धा पडताळले जाते. यावेळेस प्रमाणपत्र जर अधिकाऱ्यांकडून बाद करण्यात आले तर उमेदवाराला पदावर नियुक्त होता येत नाही.
- एकापेक्षा जास्त खेळाचे प्रमाणपत्र एकाच उमेदवाराकडे असेल तर त्या प्रमाणपत्र पैकी एकच प्रमाणपत्र वैध धरले जाईल.
[ MPSC Civil Service Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी दिव्यांग आरक्षणाचे नियम खालीलप्रमाणे.
- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमन नुसार दिव्यांग उमेदवाराला एकूण पदांवर आरक्षण देण्यात येईल.
- दिव्यांग व्यक्ती ला आरक्षण देताना दिव्यांग व्यक्ती कोणत्या सामाजिक प्रवर्गाचा आहे हे न पाहता दिव्यांग प्रवर्गातून गुणवत्तेनुसार त्याला नियुक्ती द्यावी लागणार आहे.
- अर्ज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग 40% पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र त्या व्यक्तीकडे असणे बंधनकारक आहे.
- 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या उमेदवारांना लक्षणीय दिव्यांग मधील पद देण्यात येईल.
- 40% किंवा 40% पेक्षा कमी दिव्यांग असलेल्या उमेदवारांना संबंधित दिव्यांग प्रकारांमधून आरक्षण देण्यात येईल.
- दिव्यांग प्रकारातील कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवाराला दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
- जे उमेदवार दिव्यांग नसून दिव्यांग असल्याचा बनाव करत आहेत आशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- दिव्यांग उमेदवाराला परीक्षा केंद्रामध्ये नियमानुसार लेखनिक मिळवता येणार आहे.
- लेखनिकाची मदत मिळवण्याकरिता उमेदवाराला परीक्षेपूर्वी अर्ज करावा लागणार आहे.
- जे दिव्यांग उमेदवार हाता द्वारे लिहिण्याकरिता सक्षम नसणार आहेत. अशा उमेदवारांना लेखक मेळावा म्हणून सात दिवस अगोदर आयोगाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
- अर्ज करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक स्वतः उपलब्ध करायचा आहे. किंवा दिव्यांग उमेदवाराला आयोगाद्वारे लेखनाची आवश्यकता आहे. याचा उल्लेख दिव्यांग उमेदवारांनी अर्जामध्ये स्पष्टपणे करावा. त्यानुसार त्याचा विचार आयोगाद्वारे करण्यात येईल.
- जर दिव्यांग उमेदवारांनी लेखणीका साठी अर्जाद्वारे मागणी केली नसेल तर अशा उमेदवारांना परीक्षेला लेखनिक घेऊन बसता येणार नाही.
- ज्या उमेदवारांना लेखणीक घेऊन परीक्षेला बसता येणार आहे. आशा उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- MPSC Civil Services Bharti 2024 दिव्यांग उमेदवारांनी लेखनीकासाठी अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर ‘ दिव्यांगांसाठी सूचना ‘ दिलेल्या आहेत. त्या सूचना दिव्यांग उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचा.
[ MPSC Civil Service Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अनाथ उमेदवारांच्या आरक्षणा करिता खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आलेल्या अनाथ आरक्षण तरतुदीनुसार अनाथ उमेदवारांना एकूण पदांमध्ये जागेचे आरक्षण मिळेल.
- कोणत्याही भरतीमध्ये एका प्रवर्गातील जागेमध्ये अनाथ उमेदवारांची भरती गुणवत्तेनुसार करायचे आहे. जर त्या प्रवर्गामध्ये मनात उमेदवार उपलब्ध झाला नाही. तर इतर प्रवर्गातील अनाथ उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करायचे आहे.
- अर्ज करणारा उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून त्याची निवड करण्यात येईल.
- मागासवर्गीय, दिव्यांग आणि खेळाडू या उमेदवारांकरिता वयाच्या अटी मध्ये सूट देण्यात आलेली आहे.
- दिव्यांग उमेदवारांकरिता वयोमर्यादा 45 वर्षे राहील. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा 43 वर्षे राहील.
[ MPSC Civil Services Bharti 2024 ] महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- 17 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 17 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी MPSC Civil Services Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- वरील दिलेली सर्व माहिती अपूर्ण असू शकते. तरी उमेदवारांनी माहिती विस्तृतपणे समजून घेण्याकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.