NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार अंतर्गत 30 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

NHM Nandurbar Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार अंतर्गत होणाऱ्या 20 जागांसाठी च्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथील भरती मधून एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 18 ऑक्टोबर 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील होणाऱ्या भरती मधून “वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, लेखाधिकारी, सहाय्यक मेट्रोन, स्टाफ नर्स, पंचकर्म तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, नोंदणी लिपिक आणि डीईओ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • 30 जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार यांच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार या भरती मधून “वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, लेखाधिकारी, सहाय्यक मेट्रोन, स्टाफ नर्स, पंचकर्म तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, नोंदणी लिपिक आणि डीईओ” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.

NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार या भरती मधील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • NHM Nandurbar Bharti 2024  वैद्यकीय अधिकारी ( आयुर्वेद ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चिकित्सा / पंचकर्म / शल्यतंत्र या विषयांमधून MD / MS पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MCI रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( युनानी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून युनानी मेडिसिन शाखेतून MD पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे MCI चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( होमिओपॅथी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून होमिओपॅथी मेडिसिन या विषयातून MD पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( आयुर्वेद ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BAMS पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे MCI चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( युनानी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BUMS पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( होमिओपॅथी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BHMS पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थे मधून BAMS / BUMS / BHMS + पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BAMS / BUMS / BHMS पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी हेल्थकेअर मॅनेजमेंट या शाखेतून MBA उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • अकाउंट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली बी.कॉम / एम.कॉम ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , टॅली ERP 9 हा कोर्स पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट मेट्रोन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून B.Sc नरसिंग पदवी आवश्यक आहे. कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
NHM Nandurbar Bharti 2024 
NHM Nandurbar Bharti 2024
  • स्टाफ नर्स ( फीमेल / मेल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून GNM कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • पंचकर्म टेक्निशियन ( महिला ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा आणि डिप्लोमा इन पंचकर्म उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • योगा इन्स्ट्रक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून BNYS केलेली असणे आवश्यक आहे.
  • फार्मसिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून D.Pharma / B.Pharma पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. MS-CIT पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • स्टोर कीपर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केला पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिनिधी आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • क्लर्क / डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. MS-CIT कोर्स पूर्ण झालेला पाहिजे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग स्पीड 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द प्रतिमिनिट असे असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे 01 वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • सदरील NHM Nandurbar Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वय मर्यादा 43 वर्षापर्यंत आहे.
  • सदरील NHM Nandurbar Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नंदुरबार असणार आहे.
  • या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” महिला व बाल रुग्णालय नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि.नंदुरबार. ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथील भरती मधील पदांकरिता वेतन खालील प्रमाणे मिळणार आहे.

  • वैद्यकीय अधिकारी ( PG ) या पदाकरिता 30,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता 28,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • वैद्यकीय अधिकारी निवासी या पदाकरिता 35,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन या पदाकरिता 35,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • लेखाअधिकारी या पदाकरिता 20,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • सहाय्यक मेट्रोन या पदाकरिता 25,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • स्टाफ नर्स या पदाकरिता 20,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • पंचकर्म तंत्रज्ञ या पदाकरिता 17,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • योग प्रशिक्षक या पदाकरिता 17,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • फार्मासिस्ट या पदाकरिता 18,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • लॅब तंत्रज्ञ या पदाकरिता 17,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • स्टोअर कीपर या पदाकरिता 18,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • नोंदणी लिपिक  या पदाकरिता 18,000 रुपये प्रति महा वेतन असेल.
  • डीईओ  या पदाकरिता 18,000 रुपये प्रति महा वेतन असेल.

NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथील भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • 18 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
  • 18 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरती संदर्भातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात वाचावी आणि संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार संदर्भात वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • NHM Nandurbar Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची सर्व शैक्षणिक गुणपत्रके अर्जासोबत लावायचे आहेत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर शासकीय कामाचा अनुभव असेल तर त्यासंदर्भातले प्रमाणपत्र उमेदवारांनी अर्जासोबत लावायचे आहे.

 

Leave a Comment