SBI SO Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 1511 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने 1511 जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 ही आहे. सदरील होणाऱ्या भरती मधून ” डेप्युटी मॅनेजर (System ) ” पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती मधील पदांकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मधून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे. सदरील भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 1511 जागांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी भरती काढलेली आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या भरती मधून ” डेप्युटी मॅनेजर (System ) – Project Management & Delivery, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations, डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security, असिस्टंट मॅनेजर (System) ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू विभाग भरती.
SBI SO Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालील प्रमाणे.
- ” डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणासह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे चार वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- “डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA यापैकी कोणती एक पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चार वर्षे कामाचा अनुभव असावा.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा चार वर्षाचा अनुभव असावा.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुणाने B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cyber security) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 50% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क्सने B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- डेप्युटी मॅनेजर (System ) – Project Management & Delivery, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations, डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 25 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
- असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असावे.
- सदरील SBI SO Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- या SBI SO Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या General/EWS/OBC उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 750 रुपये असणार आहे. SC/ST/PWD या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे सदरील भरतीची प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
SBI SO Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी संबंधित पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता, संपूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, पिनकोड, पॅन कार्ड यांसारख्या सर्व गोष्टी अर्जामध्ये व्यवस्थित भरायचे आहेत. अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चूक झाली तर संबंधित उमेदवाराचा अर्ज तात्काळ बाद करण्यात येईल. आणि यासाठी जबाबदार संबंधित उमेदवार असेल.
- 14 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती करिता जे उमेदवार इच्छुक आहेत अशा सर्व उमेदवारांनी बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.
SBI SO Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत . त्या उमेदवारांमधून च योग्य उमेदवारांना पदावर नियुक्त करण्यात येईल. इतर कोणत्याही अर्ज न करणाऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार नाही.
- सदरील SBI SO Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या किंवा सदरील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात येणार नाही.
- सदरील भरती दरम्यान कोणत्याही उमेदवाराने कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केल्यास त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
- सदरील SBI SO Bharti 2024 भरती प्रक्रियेमध्ये ज्या पदांकरिता अनुभवी उमेदवारांची गरज आहे. त्या ठिकाणी कोणत्याही नवख्या उमेदवाराला संधी मिळणार नाही. त्यामुळे तशी मागणी उमेदवारांनी करू नये.
- भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
SBI SO Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती मधील पदांचे जागेनुसार विवरण खालील प्रमाणे.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery या पदासाठी एकूण 187 रिक्त जागा आहेत.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations या पदासाठी एकूण 412 रिक्त जागा आहेत.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations या पदासाठी एकूण 80 रिक्त जागा आहेत.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect या पदासाठी एकूण 21 रिक्त जागा आहेत.
- डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security या पदासाठी एकूण 07 रिक्त जागा आहेत.
- असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी एकूण 798 रिक्त जागा आहेत.
- SBI SO Bharti 2024 सदरील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भरती मधून एकूण 1511 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती संदर्भातील वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.